'लष्करे'चा म्होरक्‍या चकमकीमध्ये ठार

वृत्तसंस्था
रविवार, 2 जुलै 2017

अनंतनागमध्ये चकमक; आणखी एक दहशतवादी आणि दोन नागरिकांचाही मृत्यू

श्रीनगर : लष्करे तैयबाचा म्होरक्‍या बाशीर लष्कारीसह दोन दहशतवाद्यांना सुरक्षारक्षकांनी चकमकीत ठार मारले. काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात ही कारवाई झाली. या कारवाईदरम्यान दोन सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला.

अनंतनागमध्ये चकमक; आणखी एक दहशतवादी आणि दोन नागरिकांचाही मृत्यू

श्रीनगर : लष्करे तैयबाचा म्होरक्‍या बाशीर लष्कारीसह दोन दहशतवाद्यांना सुरक्षारक्षकांनी चकमकीत ठार मारले. काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात ही कारवाई झाली. या कारवाईदरम्यान दोन सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला.

बाशीर लष्कारी हा जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या सहा पोलिसांच्या हत्येचा सूत्रधार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील ब्रेंती-बातपोरा भागात लष्कारी आणि त्याचे सहकारी लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी आज सकाळीच या भागाला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली. ही शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरू केला. या वेळी दहशतवाद्यांनी 17 नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर केल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. मात्र, अंतिम हल्ला करण्यापूर्वी पोलिसांनी या सर्व नागरिकांची सुटका केली आणि लष्कारी आणि आझाद दादा या दोन दहशतवाद्यांना ठार मारले.

दरम्यान, पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असताना ताहिरा (वय 44) यांचा गोळी लागून मृत्यू झाला. तर, शोधमोहिमेदरम्यान निदर्शने करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना शोदाब अहमद चोपन (वय 21) या युवकाचा मृत्यू झाला, असा दावा केला जात आहे. इतर चारजणही या वेळी जखमी झाले. 16 जूनला दक्षिण काश्‍मीरमध्ये अचबल भागात लष्कारी आणि त्याच्या गटाने पोलिसांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात वरिष्ठ पोलिस अधिकारी फिरोज अहमद दार आणि इतर पाच पोलिस हुतात्मा झाले होते.

देश

चंडीगड: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला शिक्षा सुनावल्यानंतर हरियानात हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी हनीप्रीत इन्सानविरुद्ध...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

हैदराबाद: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम (एमबीबीएस) प्रवेशास पात्र न ठरल्याने पतीने पत्नीला जाळल्याची घटना येथे नुकतीच घडली. याप्रकरणी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

देवरिया (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात पंधरा वर्षे वयाच्या विद्यार्थीनीचा शाळेच्या तिसऱया मजल्यावरून पडून मृत्यू...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017