शशिकला यांना तुरुंगात पाच खोल्या मिळत असल्याचे उघड

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जुलै 2017

श्रीनगर: बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगवास भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही. शशिकला यांना खरोखरच विशेष वागणूक मिळत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. राज्याचे नवे अतिरिक्त तुरुंग महासंचालक एस. मेघारिक आणि पोलिस उपमहानिरीक्षक रेवण्णा यांनी ही माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

शशिकला यांना विशेष वागणूक मिळत असल्याचे आणि त्यासाठी दोन कोटी रुपयांची लाच तुरुंग अधिकाऱ्यांना दिल्याचे अहवालातून उघड करणाऱ्या पूर्वीच्या उपमहानिरीक्षक डी. रूपा आणि पूर्वीचे अतिरिक्त तुरुंग महासंचालक सत्यनारायण राव यांच्यात या प्रकरणावरून वाद निर्माण झाल्याने त्यांची बदली होऊन हे नवे अधिकारी आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकला आणि मुद्रांक गैरव्यवहारातील आरोपी अब्दुल करीम तेलगी यांना तुरुंगामध्ये विशेष सोयी मिळत असल्याचे डी. रूपा यांनी अहवलात म्हटले होते. यानंतर कर्नाटक सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या समितीसमोर मेघारिक आणि रेवण्णा यांनी अहवालातील माहिती खरी असल्याचे सांगितले आहे. शशिकला यांना तुरुंगामधील नव्या इमारतीमध्ये पाच खोल्या देण्यात आल्या असून, त्यांच्यासाठी वेगळे स्वयंपाकघरही उभारण्यात आले आहे. काही कैदी त्यांचे सेवक म्हणूनही काम करत आहेत, असे रूपा यांनी अहवालात म्हटले आहे.