काश्मीर: माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्याचा खात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 23 जुलै 2017

शनिवारी रात्री सीमेपलिकडून घुसखोरी होत असल्याचे दिसल्यानंतर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला. परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

जम्मू - जम्मू-काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावत एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सीमेपलिकडून घुसखोरी होत असल्याचे दिसल्यानंतर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला. परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. दहशतवाद्याकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही.

पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार करण्याच्या घटना सुरुच आहेत. नौगाम सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याकडून 19 जुलैला गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात एक जवानही हुतात्मा झाला होता. दहशतवादी कारवायांमध्येही काश्मीर खोऱ्यात वाढ झाली आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :