पाकच्या गोळीबारात महाराष्ट्रातील जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेवरील शस्त्रसंधीचा भंग करत केलेल्या गोळीबारात जखमी झालेले महाराष्ट्रातील सांगलीतील जवान नितीन सुभाष कोळी आज (शनिवार) सकाळी हुतात्मा झाले.

श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेवरील शस्त्रसंधीचा भंग करत केलेल्या गोळीबारात जखमी झालेले महाराष्ट्रातील सांगलीतील जवान नितीन सुभाष कोळी आज (शनिवार) सकाळी हुतात्मा झाले.

जम्मू, कथुआ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये शनिवारी पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. उखळी तोफा आणि रायफल्सचा वापर पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आला. भारतीय जवानांनी त्यांना दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या अनेक लष्करी ठाण्यांचे मोठे नुकसान झाल्याचे "बीएसएफ‘ने सांगितले आहे. मात्र, या गोळीबारात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले आहेत. मनदीपसिंग यांच्या मृतदेहाची दहशतवाद्यांनी विटंबना केली. तर, नितिन कोळी हे जखमी झाले होते. आज सकाळी उपचारादरम्यान ते हुतात्मा झाले.

माछिल सेक्टरमध्ये पाक सैन्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना नितीन कोळी जखमी झाले होते. नितीन कोळी यांचे वय 28 असून, त्यांना दोन मुले आहेत.

Web Title: Jawan Dies in Pakistan’s Ceasefire Violation in Kupwara