काश्मीरमध्ये आंदोलकांनी फोडले जवानाचे डोळे

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलकांनी एका जवानाला पळून-पळून मारत डोळे फोडल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘एसएसपी श्रीनगर येथील सुरक्षा अधिकारी शफाकत अहमद यांना 14 जुलै रोजी आंदोलकांनी पळून-पळून बेदम मारहाण केली. अहमद हे खाली पडल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या डोळ्यांवर हल्ला करत डोळे फोडले. अहमद यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.‘

जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलक जवानांना घेरून त्यांच्यावर हल्ला करू लागले आहेत. शिवाय, त्यांच्याकडील शस्त्रास्रे लुटताना दिसत आहेत. विविध ठिकाणी जवानांच्या वाहने पेटवून दिली आहेत. पुलगाम येथील दमहल हांजी पोरा पोलिस स्टेशनवर हल्ला करत आंदोलकांनी 70 रायफली पळविल्या आहेत.