जयललिता यांची भाची राजकीय आखाड्यात

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

"एमजीआर' यांचे वारस असल्याचा दावा

चेन्नई- "एमजीआर' यांचे वारस आपण असल्याचा दावा करीत तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या भाची दीपा जयकुमार यांनी राजकारणात उडी घेतली. अण्णा द्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांची जन्मशताब्दी यंदा आहे. त्या मुहूर्तावर दीपा जयकुमार यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

"एमजीआर' यांचे वारस असल्याचा दावा

चेन्नई- "एमजीआर' यांचे वारस आपण असल्याचा दावा करीत तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या भाची दीपा जयकुमार यांनी राजकारणात उडी घेतली. अण्णा द्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांची जन्मशताब्दी यंदा आहे. त्या मुहूर्तावर दीपा जयकुमार यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकची सूत्रे त्यांची मैत्रिण शशिकला यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. जयललिता यांचे विश्‍वासू सहकारी ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे सध्या मुख्यमंत्रिपद आहे. अशा वेळी दीपा जयकुमार यांनी आपणच "एमजीआर' यांचे वारसदार असल्याचा दावा केला आहे. जयललिता यांच्या जन्मदिवशी 24 फेब्रुवारी रोजी आपण पुढील निर्णय घेऊ, असे त्यांनी जाहीर केले आहे.

मरिना किनाऱ्यावर "एमजीआर' यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर दीपा यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्या म्हणाल्या, ""मी माझे सार्वजनिक आयुष्य सुरू करीत आहे. जयललिता यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण लोकसेवा करण्यासाठी राजकारणात उतरणार आहोत.'' अण्णा द्रमुक पक्षात प्रवेश करायचा की नवीन पक्ष काढायचा, यावर विचार करण्यासाठी थोडा अवधी हवा असून, 24 फेब्रुवारी रोजी याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांच्या समर्थकांनी घोषणा देत त्यांना पाठिंबा दर्शविला.
जयललिता यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय पटलावर अनेक बदल झाले आहेत. अम्मा यांच्या आशीर्वादाने मी माझे सार्वजनिक आयुष्य सुरू करणार आहे. "एमजीआर' किंवा जयललिता यांच्याशिवाय इतरांना आपला नेता म्हणून त्या स्वीकारणार नाहीत, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

आपण संपूर्ण राज्याचा दौरा आपण करणार असून, समर्थकांशी संवाद साधणार आहोत. तसेच लोकांची मते जाणून घेणार आहोत, असे त्या म्हणाल्या. आपल्या राजकीय प्रवासात भाजपसह अन्य कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेण्याची शक्‍यता त्यांनी फेटाळून लावली. राजकीय योजनांविषयी आपण अद्याप कोणाशीही चर्चा केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

दीपा यांच्यासाठी "फलकबाजी'
जयललिता यांच्या निधनानंतर गेल्या वर्षी 29 डिसेंबर रोजी अण्णा द्रमुक पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक झाली होती. यात पक्षाची सूत्रे जयललिता यांच्या घनिष्ट मैत्रीण व्ही. के. शशिकला यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय एकमताने होऊन त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी अधिकृत निवड झाली. मात्र, समर्थकांच्या एक मोठा गटाचा दीपा जयकुमार यांना पाठिंबा असून, त्यांनी राजकारणात यावे, असा आग्रह त्यांनी धरला होता. नेत्याच्या रूपात जयकुमार यांची प्रतिमा जनतेपुढे आणण्यासाठी अनेक फलक व भित्तिपत्रके त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात व तमिळनाडूच्या अनेक भागात लावण्यात आली आहेत. काही फलकांवर दीपा जयललिता यांना पुष्पगुच्छ देत असल्याचे छायाचित्र झळकत आहे.

देश

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा होत असतानाच १५ ऑगस्ट रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की...

02.06 PM

नवी दिल्ली : भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. एका...

01.15 PM

रायपूर (छत्तीसगड) : रायपूरमधील दुर्ग जिल्ह्यात सरकारी गोशाळेतील 110 गायींचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उडकीस आली...

12.21 PM