जयललितांच्या निधनाच्या धक्‍क्‍याने 470 जणांचा मृत्यू

जयललितांच्या निधनाच्या धक्‍क्‍याने 470 जणांचा मृत्यू
जयललितांच्या निधनाच्या धक्‍क्‍याने 470 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री व अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्या निधनाने दु:ख सहन न झाल्याने मरण पावलेल्यांची संख्या वाढतच असून ती आता 470 वर पोचली आहे. त्यांच्या निधनाबद्दल अण्णा द्रमुकने शोक व्यक्त केला असून, 470 मृतांच्या कुयुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

प्रथम अभिनेत्री जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविल्यानंतर त्यांनी राजकारणातही तेवढेच यश प्राप्त केले होते. त्या सर्वसामान्यांना सहजपणे भेटणाऱ्या आणि तळागाळातील घटकांसाठी कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविणाऱ्या मुख्यमंत्री असल्याने त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा होता. त्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांना मोठा धक्का बसला होता. या धक्‍क्‍यामुळे आतापर्यंत 403 जण मृत्युमुखी पडले असल्याचे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे. मृतांमध्ये चेन्नई, वेल्लोर, तिरुवलई, तिरुवन्नमलई, कुड्डलूर, कृष्णगिरी, इरोड, तिरुपूर आदी ठिकाणच्या नागरिकांचा समावेश आहे. जयललितांच्या निधनामुळे 280 जण मृत्युमुखी पडल्याचे पक्षाने यापूर्वीच जाहीर केले होते. आता त्यामध्ये वाढ होऊन हा आकडा 470 वर पोचला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com