रामनाथ कोविंद यांना 'जदयू'चा पाठिंबा

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जून 2017

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (बुधवार) पक्षाची तातडीची बैठक बोलावून बैठकीनंतर कोविंद यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. कोविंद हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत.

पाटणा - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नावाला बिहारमधील सत्ताधारी पक्ष जनता दल युनायटेडनेही (जदयू) पाठिंबा दिला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (बुधवार) पक्षाची तातडीची बैठक बोलावून बैठकीनंतर कोविंद यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. कोविंद हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार असून, जदयू, राष्ट्रीय जनता दल (राजद) व काँग्रेसचा समावेश आहे. जदयूने पाठिंबा दिला असला तरी राजद आणि काँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दलित व्यक्ती म्हणून कोविंद यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी जाहीर केले होते. कोविंद यांना एनडीएतील घटक पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. आता जदयूनेही पाठिंबा दिल्याने त्यांची निवड जवळपास निश्चित मानण्यात येत आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः
जिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा; जुन्या नोटा घेणार​
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

योगासनांमुळे जग भारताबरोबर जोडले गेले: मोदी
कर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा
धोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड
रुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​
‘योगा’त रमले आयटीयन्स​
संपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी
हीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी?​
#स्पर्धापरीक्षा - 'हार्ट ऑफ एशिया' परिषद