भाजप खासदाराचे पाय धुवून 'तो' प्यायला पाणी

jharkhand bjp worker washes feet of mp nishikant dubey drinks same water
jharkhand bjp worker washes feet of mp nishikant dubey drinks same water

रांचीः भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांचे पाय धुवून ते पाणी एक कार्यकर्ता प्यायल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी टीकेची झोड उठविली आहे.

झारखंड गोड्डा येथील भाजपा खासदार निशिकांत दुबे रविवारी (ता. 16) त्यांच्या मतदारसंघात एका पूलाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा झाला. यावेळी पंकज साह हा भाजपा कार्यकर्ता निशिकांत दुबे यांचे पाय धुवून पाणी प्यायला. संबंधित व्हिडिओ पंकज यांनी फेसबुकवर अपलोड केला आहे.

निशिकांत दुबे यांनी व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केल्यानंतर काही वेळातच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. निशिकांत दुबे यांनी असे करण्यापासून त्या कार्यकर्त्याला रोखणे अपेक्षित होते, अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी व्यक्त केल्या आहेत. हे प्रकरण अंगाशी आल्यानंतर स्पष्टीकरण देताना निशिकांत दुबे म्हणाले कि, 'कार्यकर्ता पाय धुवून त्याचा आनंद व्यक्त करत असेल तर आकाश कोसळले ? झारखंडमध्ये पाहुण्याचे पाय धुतले जातात. या संपूर्ण घटनेला राजकीय रंग का दिला जात आहे ? पाहुण्याचे पाय धुणे चुकीचे आहे का ? तुम्ही तुमच्या पूर्वजांना विचारा, महाभारतात कृष्णाने पाय धुतले नव्हते का ?'

खासदार निशिकांत दुबे यांनी पूलाचे भूमिपूजन करुन खासदारांनी मोठे उपकार केले आहेत. त्यामुळे त्यांचे पाय धुवून पाणी पिण्याची इच्छा गावकऱयांसमोर व्यक्त केली होती. इच्छा पुर्ण झाल्यामुळे दुबे यांचे पाय धुवून पाणी प्यायलो आहे, असे पंकज साहने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com