झारखंडमध्ये माओवाद्यांचा नेता चकमकीत ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

रांची - झारखंडमधील गुमला जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवाद्यांचा नेता आशिष यादव ठार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुमला जिल्ह्यातील पालकोट जंगलक्षेत्रात रविवारी दुपारी ही चकमक झाली. या चकमकीत माओवाद्यांचा नेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या आशिष यादवला ठार मारण्यात यश आले आहे. त्याच्याकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

केंद्रीय राखीव पोलिस दल आणि पोलिसांनी संयुक्तरित्या मोहिम राबवत ही कारवाई केली. माओवाद्यांच्या बिहार-झारखंड विशेष भाग समितीचा तो नेता होता. आशिष यादववर सरकारकडून 25 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.