झारखंडमध्ये चुंबन स्पर्धेमुळे वाद 

Jharkhand MLA Holds Kissing Contest to Promote Modernity, Sparks Row
Jharkhand MLA Holds Kissing Contest to Promote Modernity, Sparks Row

रांची : झारखंडच्या आदिवासी बहुल संथाल परगण्यात झारखंड मुक्ती मोर्चाच्या दोन ज्येष्ठ आमदारांनी चुंबन स्पर्धा आयोजित करून मोठा वाद निर्माण केला आहे. आदिवासी परंपरेत यात काही गैर मानले जात नसल्याचा दावा आदिवासी नेत्यांनी केला आहे, तर अन्य पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी यावर टीकेची झोड उठविली आहे. 

"झामुमो'चे आमदार सायमन मरांडी, स्टीफन मरांडी यांनी पाकुड जिल्ह्यातील लिट्टीपाडा येथे वार्षिक मेळ्यात गेल्या रविवारी ही स्पर्धा घेतली. यामध्ये विवाहित जोडप्यांनी सहभाग घेत हजारो लोकांसमोर एकमेकांचे चुंबन घेतले. राज्यात अशी स्पर्धा प्रथमच झाल्याने ती पाहण्यास मोठी गर्दी झाली. यात 18 जोडप्यांनी भाग घेतला. सर्वाधिक काळ चुंबन घेणाऱ्या पहिल्या तीन जोडप्यांना बक्षिसे देण्यात आली. 

याबाबत मरांडी म्हणाले, "आदिवासी प्रेमाचे जाहीर प्रकटीकरण करण्यास संकोचतात. त्यामुळे प्रेम व आधुनिकीकरणाला चालना देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. आपल्या मनातील गोष्टी एकमेकांना न सांगितल्याने गेल्या काही वर्षांत आदिवासी पती - पत्नीत भांडणे वाढत असून घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. अशा स्पर्धांमुळे त्यांच्या मनातील संकोच दूर होण्यास मदत होईल.'' 

स्थानिक पत्रकार सुरजितसिंग यांच्या मते, ""राज्यातील हा सर्वांत मागास भाग आहे. तेथील गरिबी तसेच बकालपणा दूर करण्याऐवजी नेते अशा स्पर्धांचे आयोजन ही त्यांची चेष्टाच आहे. मूळ मद्यांपासून दूर जाण्याचा हा प्रकार आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com