काश्मीरमधील बंदिपूर येथे दोन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. तसेच पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचेही उल्लंघन करण्यात येत आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बंदिपूर येथे आज (मंगळवार) पहाटे लष्करी जवानांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदिपूर येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्करी जवान आणि पोलिसांनी संयुक्तरित्या मोहिम राबवून हि कारवाई केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार मारले. या परिसरात शोधमोहिम सुरु आहे.

पाकिस्तानी सैन्याने राजौरी सेक्टरमध्ये सोमवारी केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला होता. तर, तीन जवान जखमी झाले होते. भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. तसेच पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचेही उल्लंघन करण्यात येत आहे.

Web Title: J&K encounter: Security forces gun down two terrorists in Bandipora