काश्मीरमध्ये बस अपघातात 22 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील रेअसी जिल्ह्यात प्रवासी बसला झालेल्या अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी बस रेअसी येथून बकाल गावच्या दिशेने जात होती. गुरनाक परिसरामध्ये बसला अपघात झाला. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. यावेळी झालेल्या अपघातात 22 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

घटनास्थळी पोलिस व प्रशासकीय अधिकारी दाखल झाले आहेत. अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक ताहीर साजद भट यांनी दिली.