काश्‍मीरमध्ये पीडीपी नेत्याची गोळी घालून हत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

गनी हे श्रीनगर येथे जात असताना पहू व पिंगलान यामधील भागामध्ये संशयित दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली

नवी दिल्ली - दक्षिण काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यामधील पिंगलान भागामध्ये संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे जखमी झालेल्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) एका ज्येष्ठ नेत्याचा मृत्यु झाला आहे.

अब्दुल गनी दर हे पुलवामा जिल्ह्याचे पक्षाध्यक्ष होते. गनी हे श्रीनगर येथे जात असताना पहू व पिंगलान यामधील भागामध्ये संशयित दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. या हल्ल्यानंतर गनी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्‍टरांनी त्यांना घटनास्थळी मृत घोषित केले. गनी यांना छातीत गोळी घालण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.