यासिन मलिकची चार महिन्यांनंतर सुटका

Yasin Malik
Yasin Malik

श्रीनगर - जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रन्टचा (जेकेएलएफ) नेता मोहम्मद यासिन मलिक याची आज (रविवार) चार महिन्यांनंतर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वणी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना ठार मारल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी यासिन मलिकला 8 जुलैला मैसुमा येथून अटक केली होती. तेव्हापासून तो श्रीनगरमधील मध्यवर्ती कारागृहात होता. अखेर आज चार महिन्यांनंतर त्याची सुटका करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्याला अटक करण्यात आली होती.

यासिन मलिक आज सायंकाळी आपल्या घरी पोहचणार आहे. कोठीबाग पोलिस ठाण्यातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची रवानही श्रीनगर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. बुऱ्हाण वणीला ठार मारल्यानंतर काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात 85 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com