सलमान खानला परदेशात जाण्यास जोधपूर न्यायालयाची परवानगी

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 एप्रिल 2018

अभिनेता सलमान खानला काळविट शिकारप्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याला जामीन देण्यात आला होता. परदेशात जाण्याबाबत सलमान खानने जोधपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.

जोधपूर : काळविट शिकारप्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोन दिवस कारागृहात मुक्काम केल्यानंतर त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर आता त्याला परदेशात जाण्यासाठी जोधपूर न्यायालयाने परवानगी दिली आहे. 

salman

अभिनेता सलमान खानला काळविट शिकारप्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याला जामीन देण्यात आला होता. परदेशात जाण्याबाबत सलमान खानने जोधपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासुनावणीदरम्यान न्यायालयाने ही याचिका मान्य केली. त्यामुळे सलमान खानचा परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, सलमान खान कॅनडा, नेपाळ आणि अमेरिका मे 25 ते जुलै 10 यादरम्यान जाणार आहे. 

Web Title: Jodhpur court allows Salman Khan to travel abroad