...त्यामुळे न्यायाधीश नियुक्तीचा आग्रह: केजरीवाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - एक बलात्कारपीडित तरुणी गेल्या अकरा वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याचा संदर्भ देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी "गतीने न्याय देता यावा म्हणून सरन्यायाधीश न्यायाधीशांच्या नियुक्तीचा आग्रह करत आहेत‘ असे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले होते. मात्र मोदींनी त्यांच्या भाषणात न्यायामूर्तींच्या नियुक्तीच्या मुद्याला स्पर्श न केल्याने सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे सरन्यायाधीशांच्या भूमिकेचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केले आहे. केजरीवाल यांनी एका इंग्रजी दैनिकातील एका वृत्ताचा संदर्भत देत एक बलात्कारपीडित तरुणी गेल्या अकरा वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याचे म्हटले आहे.