न्यायपालिका "आयएसआय'च्या दबावाखाली

न्यायपालिका "आयएसआय'च्या दबावाखाली

लाहोर : पाकिस्तानची गुप्तचर संघटना "आयएसआय' देशातील न्यायालयांवर दबाव आणत असून, सर्वात्रिक निवडणूक होईपर्यंत माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कन्या तुरुंगातच राहावेत, अशी "आयएसआय'ची इच्छा असल्याचा आरोप येथील एका न्यायाधीशानेच केला आहे. 

इस्लामाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश शौकत सिद्दीकी यांनी आज एका कार्यक्रमादरम्यान उघडपणे "आयएसआय'च्या दडपशाहीबद्दल नाराजी व्यक्त केली. "आयएसआयचे न्याययंत्रणेबरोबरच प्रसार माध्यमांवरही नियंत्रण आहे. निर्णय आपल्या मनासारखे लागावेत, म्हणून ते मुख्य न्यायाधीशांसह इतर न्यायाधीशांवर दबाव आणतात. यासाठी खंडपीठातील सदस्यांची निवडही तेच करतात. शरीफ आणि त्यांची कन्या मरियम 25 जुलैची निवडणूक होईपर्यंत तुरुंगातच राहावेत, ही आयएसआयची इच्छा आहे. न्याययंत्रणा स्वतंत्र राहिलेली नाही. माध्यमांनाही ते सूचना करतात. प्रसार माध्यमे दबावाखाली खरे सांगत नाही,' असे सिद्दीकी यांनी सांगितले. आपल्यालाही त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय देण्यासाठी "ऑफर' आली होती, मात्र स्वत:ला विकल्यापेक्षा मेलेले बरे, असेही सिद्दीकी म्हणाले. 

न्यायपालिका आणि माध्यमे हा जनतेचा आवाज असतो. हाच आवाज दाबला जात असेल, तर पाकिस्तान हा स्वतंत्र देश राहणार नाही. स्वातंत्र्यानंतर निम्मी वर्षे लष्करशाही सहन केलेला हा देश इस्लामिकही नाही आणि लोकशाहीवादीही नाही. 
- शौकत सिद्दीकी, न्यायाधीश 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com