न्या. लोयाप्रकरण ; रविशंकर प्रसाद यांच्याकडे निकालापूर्वीच प्रत हाती : काँग्रेसचा आरोप

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 एप्रिल 2018

याप्रकरणाची प्रत अद्याप कोणत्याही माध्यमांना किंवा कोणत्याही वकिलांना मिळाली नाही. तसेच आता सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइटही हॅक करण्यात आली आहे.

- रणदीप सूरजेवाला, प्रवक्ते, काँग्रेस

नवी दिल्ली : न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर न्यायालयाच्या या निर्णयावर काँग्रेसने उघडपणे नाराजी व्यक्त केली. तर याच मुद्यावरून भाजपकडून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे याप्रकरणाचा निकाल येण्यापूर्वी त्याची प्रत त्यांच्याकडे होती, असा आरोप केला.   

रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसने राजकीय स्वार्थापोटी न्यायालयाचा वापर करू नये. त्यानंतर आता रणदीप सूरजेवाला यांनी न्या. लोयाप्रकरणाचा निकाल येण्यापूर्वीच याची प्रत कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे देण्यात आल्याचा आरोप केला. सूरजेवाला यांनी ट्विटवर यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याप्रकरणाच्या निकालाची प्रत रविशंकर प्रसाद यांच्याकडे आलीच कशी, असा सवाल उपस्थित केला.

याप्रकरणाची प्रत अद्याप कोणत्याही माध्यमांना किंवा कोणत्याही वकिलांना मिळाली नाही. तसेच आता सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइटही हॅक करण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वी न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले होते. 

Web Title: Justice loya death case congress leader Randeep Surjewala Criticizes on Ravi Shankar Prasad