लोकसभा निवडणुकीत कोणाशीही युती नाही: चंद्रशेखर राव

K Chandrasekhar Rao Said Ready For General Election TRS Has No Alliance With Any Party
K Chandrasekhar Rao Said Ready For General Election TRS Has No Alliance With Any Party

हैदराबाद : लोकसभा निवडणुकाच्या आधी सर्व भाजप विरोधी पक्ष एकत्र येण्याची चिन्हे दिसत असताना, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी 2019 ची लोकसभा निवडणुक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही 2019 ची लोकसभा निवडणुक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच, चंद्रशेखर राव यांनी ही निर्णय घेतल्याने विरोधकांना धक्का बसला आहे.

यावेळी, चंद्रशेखर राव यांनी स्पष्ट केले की, येणाऱ्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती कुठल्याही पक्षासोबत युती करणार नाही. त्याचबरोर, लोकसभेसाठी पुढील महिन्यात उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे. टीआरएस निवडणुकांसाठी केव्हाही तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांना वगळून तिसरी आघाडी बनवण्याकडे आपला कल आहे. तिसरी मजबूत आघाडी बनवायला वेळ लागेल परंतु, ही नक्की बनेल. या संदर्भात आपण ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासोबतही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती 100 जागांवर निश्चित विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर, सरकार हैदराबादच्या विकासासाठी 50000 कोटी रुपये खर्च करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com