कालिंदी एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; जिवीतहानी नाही

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

या अपघातामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर डबा हटविण्यात आल्यानंतर दिल्ली-हावडा मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

कानपूर - भिवानी-कानपूर-भिवानी दरम्यान धावणाऱ्या कालिंदी एक्स्प्रेसने आज (सोमवार) पहाटे मालगाडीला धडक दिल्याने रेल्वे रुळावरून घसरली. या अपघातात जिवीतहानी झाल्याचे वृत्त नसून, मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूर येथून हरियानातील भिवानीला जात असलेल्या कालिंदी एक्स्प्रेसने पहाटे दोनच्या तांदला स्टेशनजवळ मालगाडीला धडक दिली. यामुळे पहिला डबा रुळावरून घसरला. या अपघात जिवीतहानी झाली नसून, काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

या अपघातामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर डबा हटविण्यात आल्यानंतर दिल्ली-हावडा मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. तांदला-गाझियाबाद हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.