'..हा तर दंगलीतील कॉंग्रेसच्या सहभागाचा पुरावा'

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जून 2016

मुंबई - कॉंग्रेसचे पंजाबमधील सरचिटणीस कमलनाथ यांनी पंजाबच्या प्रभारीपदावरून राजीनामा देणे म्हणजे 1984 ची शीखविरोधी दंगल ही कॉंग्रेसनेच घडविण्याचा सबळ पुरावा असल्याच्या प्रतिक्रिया राज्य गृहमंत्री किरण रिजिजू यंनी केले आहे.
1984 च्या शीखविरोधी दंगलीतील कथित सहभागाचा मुद्दा अडचणीचा ठरत असल्यामुळे कमलनाथ यांनी स्वत: पंजाबच्या प्रभारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी सोनिया गांधी यांना पत्र लिहून केली आहे. यामुळे पक्षाला अनावश्‍यक प्रश्‍नांवर प्रतिवाद करण्याऐवजी प्रचारावर लक्ष केंद्रित करता येईल, असाही युक्तिवाद कमलनाथ यांनी केला आहे.

या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना रिजीजू म्हणाले, ‘कमलनाथ हे पंजाबमधील प्रभारीपदावरून माघार घेत असल्याचे वृत्त समजले. कदाचित कॉंग्रेसला त्यांच्या चुकीची जाणीव झाली असेल. 1984 मधील शीखविरोधी दंगल ही कॉंग्रेसचा आणि त्यांच्या नेत्यांचा सुनियोजित कट होता याचा हा स्पष्ट पुरावा आहे.‘ दरम्यान पंजाबच्या प्रभारीपदी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची निवड होण्याची शक्‍यता असल्याचे वृत्त आहे.