कपिल मिश्रांना रुग्णालयात जाण्याचा सल्ला

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

या तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले, की आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, त्यांनी नकार दिला आहे. मिश्रांचा रक्तदाब व शुगर सामान्य असून, त्यांच्या आणखी काही चाचण्या करण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करणारे आम आदमी पक्षाचे (आप) नेते कपिल मिश्रा यांचे आज(शनिवार) चौथ्या दिवशी आमरण उपोषण सुरुच असून, त्यांना प्रकृतीच्या कारणामुळे रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी आपचे नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप मिश्रा यांनी केला होता. याबद्दल त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. केजरीवाल यांनी आपच्या पाच नेत्यांच्या परदेश दौऱ्याची माहिती जाहीर करावी, अशी मागणी करत त्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. गेल्या चार दिवसांपासून ते उपोषणाला बसले असून, त्यांच्या प्रकृतीची आज डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.