येडियुरप्पांनी दलिताच्या घरी मागवले हॉटेलमधून जेवण

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

कर्नाटकमध्ये भाजप नेते येडियुरप्पा यांच्यासह इतर काही नेत्यांनी दलित व्यक्तीच्या घरी नाश्ता करण्यास गेले असताना चक्क हॉटेलमधून जेवण मागवल्याचे उघड झाल्याने ते विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले.

बंगळूर - कर्नाटकमध्ये भाजप नेते येडियुरप्पा यांच्यासह इतर काही नेत्यांनी दलित व्यक्तीच्या घरी नाश्ता करण्यास गेले असताना चक्क हॉटेलमधून जेवण मागवल्याचे उघड झाल्याने ते विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले.

भाजप नेते त्यांच्या कर्नाटकतील तुमाकुरु जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान एका दलिताच्या घरी नाश्ता करण्यासाठी गेले होते. परंतू नाश्ता मात्र हॉटेलमधून मागवला गेला. यावरून विरोधकांनी भाजप नेत्यांना धारेवर धरले. भाजप नेते आजही अस्पृश्यता पाळतात याचेच हे उदाहरण असल्याची टीका विरोधकांनी केली. तसेच त्यांच्या या कृत्यातून अस्पृश्यता दिसून येते म्हणून पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

भाजप नेत्यांनी मात्र आम्ही त्या दलित परिवारावर आमच्या जेवणाच्या खर्चाचा भार पडू नये म्हणून बाहेरून जेवण मागवल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.