'अधिकाऱ्यांनो, कन्नड शिका'; कर्नाटकात आदेश

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मार्च 2017

कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना कन्नड ही प्रशासकीय भाषा म्हणून वापरण्याचे निर्देश दिले आहेत. जे कोणी असे करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही म्हटले आहे.

बंगळूर - कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना कन्नड ही प्रशासकीय भाषा म्हणून वापरण्याचे निर्देश दिले आहेत. जे कोणी असे करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही म्हटले आहे.

कर्नाटकमधील सार्वजनिक उपक्रम विभागाचे सचिव श्रीवास्तव कृष्णा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना इंग्रजी भाषा वापरण्याचे आदेश दिले होते. कृष्णा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सर्व नस्त्या (फाईल्स), शासकीय आदेश, परिपत्रके इंग्रजी भाषेत सादर करण्याचे निदेॅश दिले होते. जर तसे केले नाही तर परत पाठवले जाईल, असेही त्यांनी म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक विकास प्राधिकरणाने कृष्णा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कृष्णा यांनी आपले निर्देश तातडीने मागे घ्यावेत, असे आदेश कृष्णा यांना नोटीसमध्ये दिले आहेत. हा प्रकार निंदनीय असल्याचे म्हणत कर्नाटकमध्ये कन्नड ही प्रशासकीय भाषा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ती प्रत्येक ठिकाणी वापरण्यात यावी, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.