काँग्रेसचे 'अमित शहा' अडचणीत

shivkumar
shivkumar

नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते ज्यांच्यामुळे कर्नाटकात काँग्रेसला पुन्हा सत्ता स्थापन करता आली आणि ज्यांना काँग्रेसचे 'अमित शहा' असे म्हटले जाते ते डी. के. शिवकुमार हे 
'ईडी'ने त्यांच्या निवासस्थानी केलेल्या कारवाईमुळे अडचणीत सापडले आहेत. 
 
शिवकुमार यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर 'ईडी'ने छापे टाकून जवळपास 8 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. याबाबत शिवकुमार यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीतील घरातून हे पैसे जप्त केल्यावर या बाबतीत चौकशीसाठी अंजनैया हनुमंता यांना ताब्यात घेतले असून, त्यांनी याबाबत हे पैसे शिवकुमार यांचे असल्याची कबुली दिली आहे. हा पैसा हवाला मार्फत येथे आल्यानंतर शिवकुमार यांच्या सांगण्यानुसार या पैशाचे वाटप केले जायचे, असे सांगण्यात आले आहे. शिवकुमार यांच्या विरोधातली ही कारवाई काँग्रेस आणि जेडीएस साठी मोठा झटका आहे, असे मानण्यात येत आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिवकुमार यांनी सरकार स्थापन करण्यासाठी मोठी भुमीका बजावली होती. निवडणुकानंतर विधानसभा सदस्यांच्या रस्सीखेचीत काँग्रेस आणि जेडीएसच्या सदस्यांना एकसंध ठेवण्यात शिवकुमार यांचा मोठा हात होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com