कर्नाटकात जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत (सकाळी 9.30)

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

कर्नाटकमध्ये २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली. सुरवातीच्या मनमोजणीनुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळत आहे.

बंगळूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निकालात सुरवातीच्या मतमोजणीनुसार जनता दल (सेक्युलर) (जेडीएस) हा पक्ष किंग मेकरच्या भूमिका पार पाडण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि भाजप जवळपास काही अंतराने जवळपास आहे. त्यामुळे कोणताही एक पक्ष सत्ता स्थापन करण्यापासून दूर राहणार हे निश्चित आहे.

कर्नाटकमध्ये २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली. सुरवातीच्या मनमोजणीनुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभेचे चित्र त्रिशंकूकडे जात असून, जेडीएसची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस 78, भाजप 85 आणि जेडीएस आणि इतर 27 जागांवर आघाडीवर आहे.

कर्नाटकमध्ये 12 मे रोजी 70 टक्के मतदान झाल्यानंतर काँग्रेस, भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यात चुरशीची लढतआहे. बहुमतासाठी 112 जागा मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सत्तेवर पुन्हा दावा केला असून भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार येडियुरप्पा यांनीही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. तर धर्मनिरपेक्ष जनता दल हा पक्ष राज्यात सत्तास्थापनेत ‘किंगमेकर’ची भूमिका बजावेल, असे संकेत मतपूर्व चाचण्यांत देण्यात आले आहेत. 

साधारणत: मजमोजणी प्रारंभ होताच एक तासानंतर निकालांचा कल स्पष्ट होण्यास प्रारंभ होईल, तर सायंकाळी उशिरा सर्व निकाल लागण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस पक्षाने जर आपले बहुमत खेचून आणले अथवा सत्ता स्थापन केल्यास १९८५ पासून पहिल्यांदाच एकाच पक्षास कर्नाटकात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापनेस संधी मिळणार आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेडगे यांनी दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीनंतर मागसवर्गीय नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना पुन्हा संधी दिली जाण्याच्या तर्क-वितर्कांनाही जोर सध्या आला आहे. 

Web Title: #Karnatakaelection JDS kingmaker in Karnataka Assembly Election Congress BJP Neck To Neck