करुणानिधींची प्रकृती स्थिर

Karunanidhi is stable now
Karunanidhi is stable now

चेन्नई - डीएमके पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांना पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 94 वर्षीय करुणानिधी बऱ्याच दिवसापासून आजारी आहेत. शुक्रवारी रात्री प्रकृतीतील सुधारणेनंतर त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र, मध्यरात्री पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आता डीएमके पक्षाचे नेते ए. राजा यांनी सांगितले आहे की, रक्तदाब कमी झाल्याने त्यांना शारीरिक त्रास सुरु झाला होता. परंतु, आता त्यांची परिस्थिती स्थिर असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. चेन्नईतील कावेरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, करुणानिधी हे 96 वर्षाचे आहेत. वयोमानानुसार त्यांची प्रकृती खालावली असल्याचे कावेरी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर गुरूवारी अचानक कमी रक्तदाबाच्या समस्येमुळे करुणानिधी यांना कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले आहे.

करुणानिधींच्या ताप आणि संसर्ग वाढत चालला होता. यावेळी डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष स्टॅलिन यांनीही, करुणानिधींची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले होते. मात्र, मध्यरात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. करुणानिधी यांच्या किडनीला इन्फेक्शन झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून चेन्नईतील गोपालपूरम या त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू आहे. डॉक्टर आणि परिचारिकांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहे. याशिवाय, त्यांच्या निवासस्थानाबाहेर आणि कावेरी रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणाबाहेर गर्दी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com