शोपियाँत दहशतवाद्यांच्या गोळीबारात 2 जवान जखमी

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

या चकमकीत ठार झालेला दहशतवादी हा हिज्बुल मुजाहिदीन संघटनेचा असून, सद्दाम हुसेन मीर असे याचे नाव आहे. तो शोपियाँ जिल्ह्यातील छत्रीपुरा गावचा रहिवाशी आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. तर, हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या एक दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँ जिल्ह्यातील वंगम येथे आज (सोमवार) पहाटे झालेल्या चकमकीत एक दहशतवाद्याला ठार मारण्यात आले. एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्करी जवानांनी शोधमोहिम सुरु केली. यावेळी दहशतवाद्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या चकमकीत ठार झालेला दहशतवादी हा हिज्बुल मुजाहिदीन संघटनेचा असून, सद्दाम हुसेन मीर असे याचे नाव आहे. तो शोपियाँ जिल्ह्यातील छत्रीपुरा गावचा रहिवाशी आहे. या दहशतवाद्याजवळून रायफल, पाच एके 47 बंदुका, काडतुसे आणि हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.

Web Title: Kashmir encounter: One militant killed, two policemen injured in Shopian district