काश्‍मीरमधील वृत्तपत्रांवर बंदी नाही - नायडू

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - काश्‍मीरमध्ये तीन दिवस वृत्तपत्रांवर बंदी आणल्याचे वृत्तात तथ्य नसल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

मागील आठवड्यात तीन दिवस काश्‍मीरमधील वृत्तपत्रांवर बंदी आणल्याच्या वृत्तासंदर्भात नायडू बोलत होते. "सोमवारी मी जम्मू आणि काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याशी मी वृत्तपत्रांरील बंदीच्या वृत्ताविषयी चर्चा केली. मात्र असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.‘ तसेच असा कोणताही निर्णय भविष्यात घेण्यात येणार नसल्याची खात्रीही मेहबूबा मुफ्ती यांनी दिल्याचे नायडू यांनी सांगितले.

‘हिज्बुल मुजाहिदीन‘ या संघटनेचा कुख्यात दहशतवादी बुऱ्हाण वाणी हा लष्कराशी झालेल्या चकमकीत ठार झाल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यामध्ये प्रचंड हिंसाचार उसळला होता. हिंसाचारामुळे परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामध्ये आतापर्यंत 40 जणांचा मृत्यु झाला आहे. नवी दिल्ली - काश्‍मीरमध्ये तीन दिवस वृत्तपत्रांवर बंदी आणल्याचे वृत्तात तथ्य नसल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

मागील आठवड्यात तीन दिवस काश्‍मीरमधील वृत्तपत्रांवर बंदी आणल्याच्या वृत्तासंदर्भात नायडू बोलत होते. "सोमवारी मी जम्मू आणि काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याशी मी वृत्तपत्रांरील बंदीच्या वृत्ताविषयी चर्चा केली. मात्र असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.‘ तसेच असा कोणताही निर्णय भविष्यात घेण्यात येणार नसल्याची खात्रीही मेहबूबा मुफ्ती यांनी दिल्याचे नायडू यांनी सांगितले.

‘हिज्बुल मुजाहिदीन‘ या संघटनेचा कुख्यात दहशतवादी बुऱ्हाण वाणी हा लष्कराशी झालेल्या चकमकीत ठार झाल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यामध्ये प्रचंड हिंसाचार उसळला होता. हिंसाचारामुळे परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामध्ये आतापर्यंत 40 जणांचा मृत्यु झाला आहे.
 
टॅग्स