काश्मीर भारताचाच भाग : राजनाथसिंह

काश्मीर भारताचाच भाग : राजनाथसिंह

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग आहे. हा भाग भारताचाच राहील. कोणतीही शक्ती त्याला आमच्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज (रविवार) पाकिस्तानला ठणकावून सांगितले.

लखनऊ येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) रॅपिड अॅक्शन फोर्सच्या आयोजित कार्यक्रमात राजनाथसिंह बोलत होते. ते म्हणाले, ''काश्मीर आमचा आहे, आमचा होता आणि आमचाच राहील. जगातील कोणतीच शक्ती त्याला आमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. जर एखादी व्यक्ती दहशतवादी कारवायांमध्ये अडकली असेल तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला त्यांचा खात्मा करण्यापासून थांबवू शकत नाही''.

दरम्यान, सीआरपीएफच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले, "दंगल, कायदा आणि सुव्यवस्थेच्या गंभीर प्रश्नांशिवाय मदत आणि बचावकार्यांमध्ये शीघ्र कृती दल (रॅपिड अॅक्शन फोर्स) अग्रेसर असते''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com