काश्‍मिरमधील तरुणाने सुरू केले 'ऑनलाईन इस्लामिक रेडिओ स्टेशन'

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

लोक काश्‍मिरमधील युवकांच्या बिकट अवस्थेबाबत काहीही न करता फक्त बोलत राहतात. त्यामुळेच मी तरुणांना आपलेसे वाटणाऱ्या एफएम रेडिओच्या माध्यमातून खरा इस्लाम समजावून सांगण्याचा निर्णय घेतला.

श्रीनगर (जम्मू-काश्‍मिर) - नव्या पिढीला, तरुणाईला खरा इस्लाम समजून सांगण्यासाठी काश्‍मिरमधील मोहम्मद आमीर मझदूर या 26 वर्षांच्या तरुणाने ऑनलाईन इस्लामिक रेडिओ स्टेशन सुरू केले आहे.

मागीलवर्षी डिसेंबर महिन्यात हे रेडिओ स्टेशन सुरू केले आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना आमीर म्हणाला, "काश्‍मिरमधील युवक इस्लामच्या मार्गापासून भरकटत असून तो ड्रग्ज, मानसिक ताणाखाली वावरत आहे. एफएम रेडिओ स्टेशन्सचा काश्‍मिरमधील युवकांवर प्रचंड प्रभाव आहे. लोक काश्‍मिरमधील युवकांच्या बिकट अवस्थेबाबत काहीही न करता फक्त बोलत राहतात. त्यामुळेच मी तरुणांना आपलेसे वाटणाऱ्या एफएम रेडिओच्या माध्यमातून काश्‍मिरमधील युवकांना खरा इस्लाम समजावून सांगण्याचा निर्णय घेतला.'

आमीरने "सौत-उल-इस्लाम' नावाचे ऑनलाईन रेडिओ स्टेशन सुरू केले आहे. आमीर सध्या "इस्लामिक स्टडीज' या विषयात पदव्युत्ती पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे.

Web Title: Kashmiri Youth started Islamic Radio Station