केजरीवाल आणि राहुल हे नाटकी राजकारणी - नक्वी

पीटीआय
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

रामपूर (उत्तर प्रदेश) - 'ओआरओपी'च्या मुद्‌द्‌याचे "राजकीय नाटक' आणि देशाच्या सुरक्षा दलांच्या मानसिकतेच्या खच्चीकरणाचा हा कट असल्याची संभावना करणाऱ्या कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी निषेध केला आहे.

"एकात्मतेसाठी पळा' या रॅलीच्या वेळी ते बोलत होते. आपल्या संकुचित फायद्यासाठी कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष हे राष्ट्रीय फायदा विसरत आहेत, हे दोन्ही नेते म्हणजे "नाटकी राजकारण्यांचे सांकेतिक शब्द' आहेत. या मुद्‌द्‌यावरील राजकारण त्यांचे उर्वरित राजकीय भवितव्य पुसून टाकेल, असा इशारा नक्वी यांनी दिला आहे. ते म्हणाले, 'प्रथम त्यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर सिमीच्या दहशतवाद्यांना ठार केल्याचा मुद्दा उपस्थित केला. आता "ओआरओपी'बाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा राजकीय शक्ती घाणेरड्या राजकीय फायद्यासाठी राष्ट्रीय फायद्यापासून दूर राहतात. सुरक्षा दले सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देतात. देशाच्या सीमेचे रक्षण करून देशात शांततेचे वातावरण ठेवतात.''

'दहशतवादी शक्तींना प्रखर विरोध करून जागतिक पातळीवर वेगळे पाडले पाहिजे,'' असे नक्वी म्हणाले.