निवडणूक आयोगावार केजरीवाल यांची टीका

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पुन्हा निवडणकू आयोगावर टीका केली आहे. अन्य विरोधी पक्षांकडून पैसे घ्या आणि आम आदमी पक्षाला मते द्या, असे सांगण्यापासून मला परावृत्त करून निवडणूक आयोग भ्रष्टाचाराला उत्तेजन देत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

गोव्यातील कंबरुजा मतदारसंघात मतदारांना पैशांचे वाटप होत असल्याचे ट्विट आपचे नेते आशुतोष यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देताना केजरीला यांनी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, ""निवडणूक आयोग हे थांबवण्यात अपयशी ठरला आहे. त्यांच्याकडून पैसे घ्या व मला मते द्या, असे म्हणण्यापासून मला मात्र आयोग रोखत आहे. यातून आयोगाला, जो तुम्हाला पैसे देतो त्याला मत द्या असाच संदेश द्यायचा आहे.''

यावर प्रतिक्रिया देण्यास मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी नकार दिला आहे.

देश

नवी दिल्ली : प्रत्येकाचा गोपनीयता राखण्याचा अधिकार म्हणजेच 'राईट टू प्रायव्हसी' हा मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय...

12.39 PM

कोलकत्ता - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोहर्रमच्या दिवशी...

12.09 PM

बंगळूर : कर्नाटकच्या पोलिस उपमहानिरीक्षक डी. रूपा यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकास (एसीबी) सादर केलेल्या आणखी एका अहवालामुळे खळबळ...

06.03 AM