ग्रेवाल कुटुंबीयांना एक कोटी देण्याचा निर्णय रद्दबातल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

केजरीवाल सरकारला नायब राज्यपालांचा धक्का

नवी दिल्ली: दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये भरपाई देण्याचा केजरीवाल सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. दिल्ली सरकारच्या सूत्रानुसार रामकिशन ग्रेवाल हे दिल्लीचे नाही, तर हरियानाचे नागरिक आहेत. त्यामुळे दिल्ली सरकारकडून भरपाई देता येणार नाही, असे नमूद केले आहे.

दिल्लीत सत्तेत आल्यानंतर केजरीवाल सरकारच्या धोरणानुसार दिल्लीत राहणाऱ्या कोणत्याही जवानास, निमलष्करी दल आणि पोलिस कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास दिल्ली सरकार संबंधिताच्या कुटुंबास एक कोटी रुपये भरपाई दिली जाते. माजी सुभेदार रामकिशन ग्रेवाल यांनी ओआरओपीसाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जंतरमंतरवर आत्महत्या केली होती. दिल्ली सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. दिल्ली सरकारकडून भरपाई दिल्यास आत्महत्यासारख्या निर्णयाचे उदात्तीकरण होईल, असे याचिकाकत्याचे म्हणणे होते. तसेच किशन ग्रेवाल हे दिल्लीचे रहिवासी नाहीत. याचवर्षी 13 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे होते. नायब राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारमध्ये संघर्ष होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी केजरीवाल सरकारने घेतलेल्या पाहुण्या शिक्षकाच्या वेतनात वाढ, किमान मजुरी वेतनात वाढ, सरकारी शाळेत क्‍लिनिक सुरू करणे यांसारख्या निर्णयाला नायब राज्यपालांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.