जंग यांच्या राजीनाम्याने केजरीवाल आश्‍चर्यचकित

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : नायब राज्यपाल नजीब जंग यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही आश्‍चर्यचकित झाले आहेत. त्याच वेळी आम आदमी पक्षाने मात्र जंग यांची खिल्ली उडविताना, त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाखाली काम केल्याचे म्हटले आहे.

नवीन नायब राज्यपालांच्या नियुक्तीनंतरही केंद्र आणि दिल्ली सरकारमधील वर्चस्वाची लढाई कायम राहणार का? असा प्रश्‍नही पक्षाने उपस्थित केला आहे. जंग यांचा राजीनामा मला आश्‍चर्यचकित करणारा असून, भविष्यातील योजनांसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो, असे केजरीवाल म्हणाले.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, कडू-गोड अनुभवांशिवाय आप सरकार आणि जंग यांनी दिल्लीत एक चांगले काम केले.
भविष्यातील योजनांसाठी जंग यांना शुभेच्छा. त्यांना नियंत्रित करणाऱ्यांना देवाने चांगली बुद्धी द्यावी. जंग यांच्या राजीनाम्यानंतरही लढाई कायम राहील? असा प्रश्‍न दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी उपस्थित केला. "आप'चे वरिष्ठ नेते कुमार विश्‍वास यांनी जंग यांच्या कार्यकाळाचे वर्णन "लाजिरवाणे' अशा शब्दात केले आहे. मोदी सरकारच्या अधीन राहून नायब राज्यपालांनी दिल्ली सरकारला अडचणीत आणले, असा आरोप करून विश्‍वास यांनी जंग यांना एक चांगले पद मिळेल, असा टोलाही लगावला.

देश

जो कुरआन में नहीं है, उसे कानून कैसे कहा जा सकता है...सर्वोच्च न्यालयाचे न्यायाधीश कुरियन यांनी निकाल देताना हे मत व्यक्‍त केले....

01.33 AM

मुझफ्फरपूर: पत्रकार राजदेव रंजन यांची हत्या व गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार महंमद...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

अहमदाबाद: गुजरातमधील दहशतवाद प्रतिबंध पथकाने (एटीएस) बनावट पासपोर्ट रॅकेटचा भांडाफोड केला आहे. गुजरात व मुंबईमध्ये हे बनावट...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017