शिवसेनेविरूद्ध कोचीमध्ये 'किस ऑफ लव्ह'

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

शिवसेनेच्या संस्कृती रक्षणाविरुद्ध (मोरल पोलिसिंग) केरळमधील कोची येथील मरिन ड्राईव्हवर फेसबुकवरील एका समूहाने आज (गुरुवार) संध्याकाळी "किस ऑफ लव्ह' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

कोची (केरळ) - शिवसेनेच्या संस्कृती रक्षणाविरुद्ध (मोरल पोलिसिंग) केरळमधील कोची येथील मरिन ड्राईव्हवर फेसबुकवरील एका समूहाने आज (गुरुवार) संध्याकाळी "किस ऑफ लव्ह' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

बुधवारी मरिन ड्राईव्हवर बसलेल्या एका जोडप्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी  "मोरल पोलिसींग'च्या नावाखाली मारहाण केली. यावेळी तेथे पोलिस निरीक्षकासह आठ पोलिस बंदोबस्तावर होते. मारहाणीची घटना रोखू न शकल्याबद्दल पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी फेसबुकवर एका समूहाने मरिन "ड्राईव्ह वर' आज "किस ऑफ लव्ह'चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची घोषणा फेसबुकवरील एका पोस्टद्वारे करण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्टुडंटस्‌ फेडरेशन ऑफ इंडियाने शिवसेनेच्या कृत्याचा निषेध केल्यानेच "किस ऑफ लव्ह'चे आंदोलन करण्यात येत आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 2014 मध्ये कोझिकोडे येथील एका हॉटेलची तोडफोड केली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ त्यावेळी कोची येथे "किस ऑफ लव्ह'चे आयोजन करण्यात आले होते.

हा केरळचा अपमान : मुख्यमंत्री
शिवसेनेच्या "मोरल पोलिसींग'चा प्रकार म्हणजे केरळचा अपमान असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी व्यक्त केल्या आहेत. केरळ विधानसभेत बोलताना ते म्हणाले, "ही घटना घडत असताना कोणतीही कारवाई न करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली आहे. तर एका पोलिस निरीक्षकाची चौकशी करण्यात येत असून अन्य नऊ जणांना निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: Kerala CM Pinarayi Vijayan slams moral policing by Shiv Sena activists