केरळमधील मुलाची आत्महत्या "ब्लू व्हेल'मुळेच

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

केरळमधील मुलाची आत्महत्या "ब्लू व्हेल'मुळेच

तिरुवनंतपुरम : "ब्लू व्हेल' या गेममुळेच माझ्या मुलानं आत्महत्या केल्याचा दावा केरळमधील पीडित कुटुंबाने केला आहे. याबाबत मनोज सी. मनू (16) या आत्महत्या केलेल्या मुलाच्या आईने पोलिस स्थानकात तक्रार दिली असून, यामध्ये आत्महत्येसाठी ब्लू व्हेलला कारणीभूत धरण्यात आले आहे. याबाबतची शक्‍यता तपासून चौकशी करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितलं.

याबाबतची मनोजच्या आईने मल्याळम वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत मनोज नोव्हेंबरपासून ब्लू व्हेल गेम खेळत असल्याचे सांगितले. त्यानंतर मनोजने स्वत:ला दुखापत करण्यास सुरवात केली. मनोजला पोहायला येत नव्हते, तरी त्याने तळ्यामध्ये उडी घेतली होती. ब्लू व्हेल गेमचा शेवटचा टप्पा हा एकतर आत्महत्या करणे किंवा एखाद्याचा खून करणे असा असतो, असे मनोजने सांगितल्याचे त्याच्या आईचे म्हणणे आहे. त्यानंतर मनोजवर रागवत गेम न खेळण्याचे बजावले असल्याचे मनोजच्या आईने पोलिसांना सांगितले.

त्यानंतर तिरुवनंतपुरमजवळील विलापिलासा येथील घरी मनोजने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर मनोजच्या कुटुंबीयांनी प्रेमसंबंधातून नैराश्‍य आल्याने आणि आई रागावली म्हणून मुलाने जीवनयात्रा संपवली असावी, असे पोलिसांना सांगितले होते.

मनोजच्या शवविच्छेदन अहवालातून अशी कोणतीही बाब स्पष्ट होत नाही. या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ब्लू व्हेलमुळे आत्महत्या केल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेनं तपास करण्यात येत आहे. त्याचा मोबाईल आणि कॉम्प्युटरची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.