देवभूमीत सरकार पुरस्कृत हिंसाचार: योगी आदित्यनाथ

yogi adityanath
yogi adityanath

किचेरी (केरळ) : बंदुकीच्या जोरावर सत्ता मिळवणे ही डाव्यांची प्रवृत्तीच आहे. देवभूमी म्हणून ओळखले जाणारे केरळ सध्या सरकार पुरस्कृत हिंसाचाराला सामोरे जात आहे. डेंगी आणि चिकुनगुनियासारख्या आजारांचा उत्तर प्रदेशने यशस्वीपणे मुकाबला केला आहे. केरळमध्ये डाव्या पक्षांना लोकांच्या मूलभूत गरजांचीही पूर्तता करता आलेली नाही, अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.

ते येथे डाव्या संघटनांच्या हिंसाचाराच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या "जनरक्षा मार्च'मध्ये आज सहभागी झाले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत मंगळवारी जनरक्षा मोहिमेचा प्रारंभ झाला होता. केरळमधील भाजपची ही यात्रा पंधरा दिवस चालणार आहे. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला स्थान असत नाही. केरळमध्ये दुर्दैवाने आज राजकीय हिंसाचार पाहायला मिळत आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही जनतेला डाव्या पक्षांच्या अराजकतेची जाणीव करून देऊ, असेही आदित्यनाथ म्हणाले. आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या सात किलोमीटरपर्यंतच्या पदयात्रेयामध्ये केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष कुम्माननदेखील सहभागी झाले होते. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कन्नूर जिल्ह्यात उद्या (ता. 5) रोजी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहादेखील सहभागी होणार आहेत.

भाजपचा आरोप
केरळमध्ये डावे पक्षविरुद्ध संघ परिवार या संघर्षामध्ये आतापर्यंत 120 जणांचा बळी गेला असून, 2001 पासून ते आतापर्यंतची आकडेवारी अभ्यासली तर 84 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुख्यमंत्री पी. विजयन यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कन्नूरमध्ये संघाच्या 14 कार्यकर्त्यांना ठार मारण्यात आले आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com