लव्ह जिहाद प्रकरणाचा "एनआयए'मार्फत तपास

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

केरळमधील घटनेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली: केरळमधील हिंदू महिलेच्या धर्मांतर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर. व्ही. रवींद्रन यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास होईल, असे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले.

केरळमधील शफीन जहान याने एका हिंदू महिलेशी विवाह केला होता. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने त्यांचा हा विवाह नामंजूर केला होता. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच केरळ पोलिसांना या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले होते.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात शफीन जहान याने एका हिंदू महिलेशी विवाह केला होता. लग्नानंतर या महिलेने इस्लाम धर्म स्वीकारला. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने हे "लव्ह जिहाद'चे प्रकरण असल्याचे सांगत हा विवाह नामंजूर केला. देशातील स्त्रियांना देण्यात आलेल्या स्वातंत्र्याचा हा अपमान असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. शफीन जहान हा "इसिस' या दहशतवादी संघटनेचा सदस्य असून, त्याला हिंदू स्त्रियांचे धर्मांतर करण्याची कामगिरी सोपवण्यात आल्याचा आरोप आहे.