नाकातून रक्तस्राव झाल्याने राज्यपाल त्रिपाठी रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

एक विशेष वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. उच्च रक्तदाबामुळे रविवारी (ता. 7) सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

कोलकता - नाकातून रक्तस्राव झाल्याने पश्‍चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या नाकातील रक्तस्राव थांबला असून, रात्री झोपही लागली होती. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयाने निवेदनाद्वारे कळविले आहे.

एक विशेष वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. उच्च रक्तदाबामुळे रविवारी (ता. 7) सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली, असे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स