निवडणूक ही घटनात्मक प्रक्रिया - किरेन रिजीजू

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नागालॅंडमधील राजकीय प्रश्‍न प्रथम सोडविण्याची मागणी तेथील आदिवासी समाज आणि नागरी संस्थांनी केली आहे. ही मागणी उचलून धरीत राज्यातील सत्ताधारी नागा पीपल्स फ्रंटसह अन्य पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय काल घेतला. "कोअर कमिटी ऑफ द नागालॅंड ट्रायबल होओस अँड सिव्हील ऑर्गनायनेझन'च्या भावनांशी केंद्र सरकार पूर्ण सहमत आहे, पण निवडणुकीवर बहिष्कार हा उपाय नाही,' असे रिजीजू म्हणाले

नवी दिल्ली - ""निवडणूक ही घटनात्मक प्रक्रिया आहे आणि केंद्र सरकार घटनेला बांधील आहे,'' असे केंद्रीय गृह राज्य मंत्री किरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले.

नागालॅंडमध्ये 27 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय राज्यातील सर्व पक्षांनी काल घेतला. त्या पार्श्‍वभूमीवर ट्विटरवरूव बोलताना रिजीजू यांनी नागालॅंडमधील प्रलंबित समस्या सोडविण्यास सरकार महत्त्व देत आहे. वेळेनुसार निवडणुका घेणे ही घटनात्मक प्रक्रिया आहे. केंद्र सरकार त्यास कटिबद्ध आहे, असे सांगितले. नागालॅंडमधील निवडणुकीसाठी भाजपची सूत्रे रिजिजू यांच्याकडे आहेत.

नागालॅंडमधील राजकीय प्रश्‍न प्रथम सोडविण्याची मागणी तेथील आदिवासी समाज आणि नागरी संस्थांनी केली आहे. ही मागणी उचलून धरीत राज्यातील सत्ताधारी नागा पीपल्स फ्रंटसह अन्य पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय काल घेतला. "कोअर कमिटी ऑफ द नागालॅंड ट्रायबल होओस अँड सिव्हील ऑर्गनायनेझन'च्या भावनांशी केंद्र सरकार पूर्ण सहमत आहे, पण निवडणुकीवर बहिष्कार हा उपाय नाही,' असे रिजीजू म्हणाले.

दरम्यान, निवडणूक न लढविण्यासाठी काल घेतलेल्या बैठकीला भाजपतर्फे उपस्थित राहणाऱ्या आणि बहिष्काच्या संयुक्त निवेदनावर सह्या करणाऱ्या दोन नेत्यांना भाजपने निलंबित केले आहे. पक्षाच्या केंद्री नेतृत्वाच्या परवानगीखेरीस हे नेते सह्या अथवा काही बोलू शकत नाही, असे याबद्दल सांगण्यात आले.

Web Title: kiren rijiju nagaland politics election