Fact Check : कोबीमधून कोरोनाचा संसर्ग होतो? जाणून घ्या सत्य

Cabbage
Cabbagee sakal

नवी दिल्ली : सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (second wave of corona) थैमान घातले आहे. याच दरम्यान कोरोनाबाबत अनेक मेसेज सोशल मीडियावर फिरत असतात. त्यातच आता कोबीमधून कोरोना होत असल्याचा दावा (viral message that corona spreads through cabbage) व्हॉट्सअ‌ॅपवरून केला जात आहे. यामागचं नेमकं सत्य काय आहे? ते आज आपण जाणून घेणार आहोत. (know truth about the viral message that corona spreads through cabbage)

Cabbage
डिसले गुरुजी जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी

व्हॉट्सअ‌ॅपवर फिरणाऱ्या या पोस्टमध्ये कोबी न खाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. कोरोनाचा विषाणू हा इतर पृष्ठभागांवर फक्त ८ ते ९ तास राहत असून कोबीमध्ये मात्र ३० तासांपेक्षा जास्त वेळ टिकत असल्याचा दावा या व्हायरल पोस्टमधून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने हे सांगितले असल्याचे या पोस्टमध्ये लिहिले आहे. मात्र, हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे.

एफपी या वृत्तसंस्थेनुसार, हा दावा पूर्णपणे खोटा असून संयुक्त राष्ट्र संघाने अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या संकेतस्थळावर कोरोनाची लागण होण्याची भीती असणाऱ्या गोष्टींमध्ये कोबीचा समावेश केलेला नाही.

दरम्यान, केंद्र सरकारच्या प्रेस इंन्फॉर्मेशन ब्युरो (PIB)ने देखील ट्विट करून हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने अशा कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत, असेही पीआयबीने सांगितले आहे. तसेच अमेरिका येथील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने देखील अन्नामधून कोरोना पसरत असल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचे त्यांच्या संकेतस्थळावर सांगितले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने हा दावा फेटाळून लावला. त्यामुळे कोबीमधून कोरोना पसरतो हे पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्हीही कोरोनाच्या भीतीमुळे कोबी खाणे सोडले असेल तर आजच सुरू करा आणि अशा कुठल्याही खोट्या मेसेजला बळी पडू नका. तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा मेसेजची खातरजमा केल्याशिवाय ते मेसेज इतरांना पाठवू देखील नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com