मालवाहू जहाजाला भीषण आग

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

कोलकाता : कोलकातामधील एका मालवाहू जहाजाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एमव्ही कोलकाता असे जहाजाचे नाव असून, जहाजातील कंटेनरमध्ये स्फोट झाल्याने आग लाल्याचे सांगितले जात आहे. या जहाजावर एकूण 22 कर्मचारी होते. त्यातील 11 क्रु मेम्बरची सुटका करण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. बदलते हवामान आणि जोरदार वाहणारे वारे यामुळे आग झपाट्याने पसरली. या आगीत 70 जहाज जळून खाक झाले आहे. कोलकात्याच्या श्रेयस लॉजिस्टिक्स या कंपनीचे हे जहाज आहे.

कृष्णपटनम येथून कोलकात्याला निघालेले हे मालवाहू जहाज होते. या जहाजावर एकूण २२ कर्मचारी या जहाजावर असल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास जहजामधील कंटेनरमध्ये स्फोट होऊन ही आग लागल्याचे समजते. पश्चिम बंगालमधील हल्दियापासून सुमारे ६० नॉटिकल्स माईल्स अंतरावर हे जहाज होते. आगीची माहिती समजताच भारतीय तटरक्षक दलाचे राजकिरण हे जहाज आणि डॉर्निअर विमान बचावकार्यासाठी पाठवले. तटरक्षक दलाच्या जहाजांद्वारे बचावकार्य सुरु आहे. कोलकाता बंदर आणि इतर ठिकाणाहून मदत पोहचवली जात आहे.

Web Title: in kolkata merchant ship on burning