'जीएसटी'मुळे दुर्गा मूर्तींच्या किमती वाढल्या

श्‍यामल रॉय
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

कोलकता: वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) यंदा दुर्गा मूर्ती बनविण्याचा खर्च वाढला असून, बंगालमधील मूर्तिकारांना याचा फटका बसला आहे. रासायनिक रंगांच्या किमती वाढल्याने यंदा मूर्तींचा खर्च चांगलाच वाढला आहे. त्याचप्रमाणे "जीएसटी'मुळे बहुतांश मिठाई पदार्थांची किंमतही वाढली आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये मिठाई खाण्याचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे मानले जाते. मिठाईवरील "जीएसटी' कर मागे घ्यावा, या मागणीसाठी येत्या 21 तारखेला राज्यातील सर्व मिठाई व्यापारी बंद पाळणार असून, राज्यभर धरणे धरणार आहेत.

यापूर्वी दुर्गा मूर्ती रंगविण्यासाठी कलाकार रंग बनवत असत. त्यासाठी हळद पावडर व चिंचुक्‍यांचा वापर केला जात असे. त्यासाठी चिंचुक्‍यांची बारीक भुकटी करून ती शंभर डिग्री सेंटिग्रेडला उकळली जात असे. त्यात हळदीची पावडर मिसळून रंग बनविला जात असे. हे रंग तुलनेने स्वःस्त तर असतच पण टिकावूदेखील होते. मात्र, हे रंग करण्यासाठी लागणारा वेळ व कष्ट लक्षात घेता गेल्या काही वर्षांत मूर्तिकार रासायनिक रंगांकडे वळले. मात्र "जीएसटी'मुळे या रंगाच्या किमती वाढल्याने हे कलाकार पुन्हा जुन्या रंगांकडे वळू लागले आहेत.

याबाबत बोलताना कुमारतुली येथील मूर्तिकार असोसिएशनचे सरचिटणीस कार्तिक पाल म्हणाले,""पूर्वी एक हजार रुपयांना मिळणाऱ्या रंगाची किंमत आता अडीच हजार रुपये झाली आहे. त्यामुळे आम्ही आता पुन्हा रंग तयार करण्याच्या जुन्या पद्धतीकडे वळलो आहोत. वर्षभरात मी किमान साठ हजार रुपयांचा रंग विकत घेतो.

"जीएसटी'मुळे दुर्गा मूर्ति बनविण्याचा खर्च वाढलेला आहे. मात्र, तुलनेने त्यांची विक्री किंमत फार वाढलेली नाही. दुर्गा पूजा आयोजित करणाऱ्यांची जादा किंमत देण्याची तयारी नाही.''

दरम्यान, नैसर्गिक पद्धतीनुसार रंग बनविण्याच्या मूर्तिकारांच्या निर्णयाचे राज्य प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष कल्याण रुद्र यांनी स्वागत केले आहे. पर्यावरणतज्ज्ञ विश्‍वजित मुखर्जी म्हणाले, ""रासायनिक रंगाच्या वापरामुळे प्रदूषणात मोठी वाढ होते. या रंगामध्ये लिड व कॅडमिअमसारखे खनिजे असतात. त्यामुळे दुर्गामूर्तींचे नदीत विसर्जन केल्यानंतर प्रदूषण वाढते.''

देश

कोलकाता : मोहरमच्या कालावधीत दुर्गा मूर्तींचे विसर्जन करण्यास राज्यातील ममता बॅनर्जी यांच्या सरकारने घातलेली बंदी आज (...

04.42 PM

बंगळूर - माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व 'कॅफे कॉफी डे'चे मालक व प्रवर्तक व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या देशभरातील...

12.00 PM

अहमदाबाद : सोशल मीडियातील 'विकास वेडा झालाय' या उपहासात्मक टीका मोहिमेमुळे गुजरातमधील भाजपचे सरकार; तसेच नेते अक्षरश: धास्तावले...

10.24 AM