जीएसटी केंद्राची मोठी चूक : ममता

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

अंमलबजावणीची घाई होत असल्याचाही आरोप

कोलकाता: वस्तू व सेवा कर (जीएसटी) ही केंद्र सरकारची मोठी चूक असल्याचा आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. याचसोबत वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) 30 जूनच्या मध्यरात्री होणाऱ्या अनावरण कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रामधील भारतीय जनता पक्षाचे सरकार जीएसटीच्या अंमलबजावणीची "अनावश्‍यक घाई' करत असल्याचेही ममता यांनी सांगितले.

तृणमूल कॉंग्रेस निषेध म्हणून जीएसटीच्या अनावरण कार्यक्रमाला जाणार नसल्याचे ममता यांनी स्पष्ट केले. ममता म्हणाल्या, ""जीएसटीच्या प्रक्रियेमध्ये सुरवातीपासून तृणमूल कॉंग्रेसने अनुकूल भूमिका घेतली आहे. मात्र, केंद्र सरकार ज्या पद्धतीने जीएसटीची अंमलबजावणी करत आहे, ती चिंताजनक आहे. आमचे पुनःपुन्हा सांगणे आहे, की जीएसटीच्या अंमलबजावणीला वेळ द्यावा.'' जीएसटीमुळे लघू व मध्यम उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचेही ममता यांनी या वेळी नमूद केले. जीएसटीची अंमलबजावणी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि पुढे काय होणार आहे, याची कोणाला साधी कल्पना नाही, असेही ममता यांनी या वेळी सांगितले. देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर विश्‍वास ठेवून आम्ही जीएसटीविरोधात लढा उभारणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.

अजून सहा महिन्यांची मुदत द्यावी
जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी. यामुळे लघु व मध्यम व्यावसायिक, तसेच यासंबंधीच्या समभागधारकांना याची समज येण्यास पुरेसा अवधी मिळेल. पण मुदतवाढ न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल व आगामी स्थितीला केंद्र सरकार सर्वस्वी जबाबदार असेल, असेही ममता यांनी सांगितले.

देश

चंडीगड: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला शिक्षा सुनावल्यानंतर हरियानात हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी हनीप्रीत इन्सानविरुद्ध...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

हैदराबाद: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम (एमबीबीएस) प्रवेशास पात्र न ठरल्याने पतीने पत्नीला जाळल्याची घटना येथे नुकतीच घडली. याप्रकरणी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

देवरिया (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात पंधरा वर्षे वयाच्या विद्यार्थीनीचा शाळेच्या तिसऱया मजल्यावरून पडून मृत्यू...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017