धूर येत असल्याने विमानातून उतरविले प्रवाशांना

वृत्तसंस्था
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

कोलकता: विमानातून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर पॅरोबाउंड ड्रुकर विमानातून प्रवाशांना तातडीने उतरविण्यात आल्याचे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक अतुल दीक्षित यांनी सांगितले.

कोलकता: विमानातून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर पॅरोबाउंड ड्रुकर विमानातून प्रवाशांना तातडीने उतरविण्यात आल्याचे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक अतुल दीक्षित यांनी सांगितले.

ते म्हणाले की, विमानाला आज सकाळी धक्का बसल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले, असे ते म्हणाले. तटरक्षक दलाचे कमांडंट के. आर. अर्जुन आणि डेप्टी कमांडंट पंकज मिश्रा हे त्यामध्ये होते. विमानातून धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी विमान अधिकाऱ्यांना सतर्क केले. त्याशिवाय या तटरक्षक दलाच्या जवानांनी 20 प्रवाशांवर प्रथमोपचार केले, असे त्यांनी सांगितले.

तटरक्षक दलाने तातडीने तेथे रुग्णवाहिका पोचविली. त्याशिवाय प्रवासी आणि चालकदलाला सुरक्षितस्थळी हलविले. विमानतळ प्राधिकरणाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले. या विमानात 61 प्रवासी आणि सात विमानांचे कर्मचारी होते.

. . . . .

टॅग्स