कुलभूषण जाधव प्रकरणी आज निकाल

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 मे 2017

नवी दिल्ली : भारताचा गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने ताब्यात घेऊन फाशीच्या शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आज (गुरुवार) निर्णय देणार आहे.

नवी दिल्ली : भारताचा गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने ताब्यात घेऊन फाशीच्या शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आज (गुरुवार) निर्णय देणार आहे.

नेदरलॅंडसमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधवप्रकरणी सुनावणी सुरू आहे. भारताच्यावतीने हरिश साळवे यांनी भारताची बाजू मांडली. पाकिस्ताननेही त्यांची बाजू मांडली आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर 14 न्यायाधीशांचे खंडपीठ आज निकाल देणार आहे. आज दुपारी साडे तीन पासून या प्रकरणी निकाल लागण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, न्यायालयाचा निर्णय पाकिस्तानला मान्य असेल का आणि पाकिस्तान त्याची अंमलबजावणी करणार का? याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र, जर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचा पाकिस्तानने अवमान केला तर पाकला आंतराष्ट्रीय स्तरावर मोठ्या नाराजीला सामोरे जावे लागणार आहे. जागतिक बॅंकेसह इतर अन्य आंतररष्ट्रीय संस्था, संघटनांकडून पाकिस्तानला असहकार्य केले जाऊ शकते, अशी शक्‍यता तज्ज्ञांयनी व्यक्त केली आहे.

दरम्यान केंद्र सरकारला आंतरराष्ट्रीय न्यायालयातील निकाल भारताच्या बाजूने लागेल, अशी खात्री आहे. 'भारताने मांडलेल्या बाजूवर पाकिस्तानने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. आम्हाला आशा आहे की न्यायालयाचा निर्णय भारताच्या बाजूने लागेल', अशा प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री पी. पी. चौधरी यांनी व्यक्त केल्या आहेत.