...मग पंतप्रधान 'टीडीपी'त जाणार - कुमार विश्वास

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेले कुमार विश्वास भाजपच्या वाटेवर असून, येत्या एक दोन दिवसात त्यांच्या पक्ष प्रवेशाची औपचारिक घोषणा भाजपतर्फे केली जाईल, असे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले होते.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे (आप) नेते कुमार विश्वास यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार अशी चर्चा रंगू लागल्यानंतर आता खुद्द विश्वास यांनीच भाजपप्रवेशाची शक्यता फेटाळून लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलगू देसम पक्षात (टीडीपी) पक्षात प्रवेश करणार असल्याची खोचक टीका केली आहे.

कुमार विश्वास हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. याप्रकरणी स्पष्टीकरण देताना विश्वास यांनी ट्विटरवरून या वृत्ताचा समाचार घेताना पंतप्रधान टीडीपीमध्ये सामील होणार आहेत. आता याची बातमी करा, असे म्हटले आहे.

आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेले कुमार विश्वास भाजपच्या वाटेवर असून, येत्या एक दोन दिवसात त्यांच्या पक्ष प्रवेशाची औपचारिक घोषणा भाजपतर्फे केली जाईल, असे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही उत्तरप्रदेश निवडणुकीनंतर पंतप्रधान काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांची आणि राहुल गांधींची भेटही झाली आहे, असे ट्वीट करुन या अफवांचा समाचार घेतला.

देश

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर "तोंडी तलाक'ची प्रथा रद्दबातल झाली असली तरीसुद्धा स्त्री पुरुष समानतेसमोर आणखी दोन...

06.24 PM

पणजी (गोवा) : विधानसभा पोट निवडणूक शांततेत होईल असे वाटत असतानाच पणजी मयदारसंघातील टोंक-करंजाळे येथील मतदान केंद्र क्रमांक...

04.09 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात आठवडाभरात झालेल्या दोन रेल्वे दुर्घटनांची जबाबादारी स्वीकारत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे...

03.36 PM