कन्या मिसा यांच्यावरील आरोप लालूंना अमान्य

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मे 2017

लालूप्रसाद यांनी हे सर्व आरोप चुकीचे आणि आधारहीन असल्याचा, तसेच मिसा भारती यांचे प्रतिमाहनन करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा केला.

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज त्यांची कन्या आणि राज्यसभा खासदार मिसा भारती यांच्यावर करण्यात आलेले आरोप नाकारले आहेत.

मिसा भारती यांनी बनावट कंपनी स्थापन करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप एका वृत्तवाहिनीने केला होता. त्याचा आधार घेत भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनीही हा आरोप केला.

लालूप्रसाद यांनी मात्र हे सर्व आरोप चुकीचे आणि आधारहीन असल्याचा, तसेच मिसा भारती यांचे प्रतिमाहनन करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा केला. तसेच आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीसही बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.